शुभांगी पाटलांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही ?

दि. १७/०१/२०२३

पिंपरी

 

पिंपरी : नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसच्या वतीने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय रद्द केला. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरला. सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र अद्याप यासंबंधीची अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसला तरीही ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतलाय. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शुभेच्छा देत त्यांना पाठिंबा देणार असल्याचं सूतोवाच केलं. सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून मागील तीन टर्म निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीने एकमताने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलल्याने हा सगळा गोंधळ झाल्याचं अजित पवार म्हणाले.उद्या फोनच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी संपर्क साधणार आहोत. त्यानंतर महाविकास आघाडीचा पाठिंबा कुणाला आहे, हे ठरेल, असं अजित पवार म्हणालेत.

नाशिक पदवीधर मतदार संघात कुणाला पाठिंबा द्यायचा यावरून महाविकास आघाडीतच मतभेद असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातही काँग्रेसच्या नेत्यांमध्येच मतभेद आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.यावरून नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. संजय राऊत हे काही काँग्रेसचे प्रवक्ते नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची नाही.

त्यामुळं आता ठाकरे गटाचा जाहीर पाठिंबा असला तरी महाविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा मिळणार की नाही हे उद्या स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *