दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागला ?

दि. १७/०१/२०२३

पिंपरी

 

पिंपरी : सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी महाविकास आघाडीतील नेत्यांचंही मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. कारण या विस्तारानंतर महायुतीमध्ये फूट पडणार, शिंदे गटातील अनेक अस्वस्थ आमदार पुन्हा एकदा बंडखोरी करणार, अशी वक्तव्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहेत. तर काही शिवसेना नेत्यांनी 2023 मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार, असाही दावा केला आहे.

अशात मंत्रिमंडळाचा विस्तार जानेवारी महिन्याचा शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. या विस्तारातही रिक्त असलेल्या सर्व २२ जागा भरल्या जाणार नाहीत. केवळ १० जागा भरल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजीनाट्य होऊ नये म्हणून फक्त १० जागा भरल्या जाणार आहेत.

आताच्या विस्तारात ८ जणांना राज्यमंत्री केले जाणार आहे. त्यात दोन जणांना कॅबिनेट मंत्री केले जाणार आहे.पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या दीपक केसरकर, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह काही जणांना स्थान मिळाले. परंतु अनेक इच्छुकांना अजूनही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. शिंदे गटातील आमदार यासंदर्भात वारंवार माध्यमांकडे वक्तव्य करताहेत.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये औरंगाबादचे संजय शिरसाट, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची नाराजी वारंवार दिसून आली. बच्चू कडू यांनी तर मोठं शक्तिप्रदर्शन केलं. त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेल्या किती आमदारांना आगामी टप्प्यात मंत्रिपद मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. परंतु विस्ताराचे अनेक मुहूर्त गेले. त्यानंतरही त्यांना स्थान मिळाले नाही.

आता मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार जानेवारी महिन्याच्या शेवटी व फेब्रवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल असं बोललं जातंय. फेब्रुवारी पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *