ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त रांजणगाव येथे वृक्षारोपण संपन्न

शिरूर : दि. १५ जून २०२३

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त, रांजणगाव गणपती ग्रा. पं. तर्फे गावामध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शिरूर पंचायत समितीचे नव्यानेच पदभार स्वीकारलेले गटविकास अधिकारी महेश डोके व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावामध्ये ग्रामपंचायत साठवणूक गृहासमोरील मोकळ्या जागेत, तसेच मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला, गावठाण जि. प. शाळा, शेळकेवस्ती जि. प. शाळा, खेडकर वस्ती जि. प. शाळा, फंडवस्ती जि. प. शाळा व महागणपती इंग्लिश मिडीयम स्कूल अशा एकूण सहा शाळांमध्ये विद्यार्थी व मुख्याध्यापकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिरूर तालुक्यात शेकडो कंपन्या असून त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असते. त्याचा परिणाम पशू पक्षी व मनुष्यावर जाणवत आहेत. औद्योगिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर तंबाखू युक्त पदार्थांच्या उत्पादनामुळे, घातक कचरा उत्सर्जनामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एकूणच पर्यावरणाचे शोषण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने, सभोवतालच्या परिसरात तापमान वाढीची समस्या जाणवत आहे.

यातून उतराई होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनी देशाचे जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या ८७ व्या वाढदिवसाच्या औचित्याने, शिरूर विकास गटामध्ये पंचायत समिती लागवड अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, कृषी विभाग अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचे काम सर्व ग्रामपंचायतींनी हाती घेतलेले आहे. मोठ्या प्रमाणावर जंगली व फळांच्या वृक्षांची लागवड कार्यक्रम संपूर्ण महिनाभर करणार आहोत. यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशन (RIA) च्या अध्यक्षांकडे ट्रीगार्ड, ठिबक सिंचन संच, सोलार मोटर ई. मदत मिळण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. सदर लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी बिहार पॅटर्न (नरेगा) अंतर्गत काही सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. तरी वृक्षमित्र, पर्यावरण प्रेमींना आवाहन करण्यात येत आहे की, हा उपक्रम यशस्वीकरण्यासाठी पंचायत समिती शिरूरच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा.

या कार्यक्रमाची सुरुवात रांजणगाव गणपती येथून करण्यात आली असून, ग्रामपंचायत रांजणगाव गणपती व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, तसेच अण्णासाहेब हजारे यांचे अनुयायी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रथम लोकनियुक्त सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच संपत खेडकर, माजी जि. प. सदस्या कविता खेडकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, ग्रा. पं. सदस्य आकाश बत्ते, विलास अडसूळ, ग्रा. पं. सदस्या सुजाता लांडे, सुप्रिया लांडे, स्वाती शेळके, अनिता बांदल, महागणपती इंग्लिश मिडीयम शाळेचे मुख्याध्यापक विकास शेळके, सामाजिक कार्यकर्त्या संगिता भूजबळ, सोनबा खेडकर, ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख, ग्रा. पं. कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *