गटप्रवर्तक व आशा वर्कर यांना सेवा शर्ती मध्ये बदल करून किमान वेतन लागू करा

रामदास सांगळे
विभागीय संपादक
११ जुलै २०२२

जुन्नर


गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या सेवा शर्ती मध्ये बदल करून किमान वेतन लागू करा. गटप्रवर्तक व आशा वर्कर यांना एप्रिल २०२२ पासून थकीत मानधन द्या.अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे २००० रू भाऊबीज द्या. केंद्र सरकार ने आशा वर्करचा कामा आधारित मोबदला दुपटीने वाढवण्यात यावा तसेच गटप्रवर्तक व आशा वर्कर यांचा एप्रिल २०२२ महिन्यापासूनचा थकीत मोबदला देण्यात यावा यासाठी दि.१ ऑगस्ट २०२२ पासून पंचायत समिती जुन्नर कार्यालयावर मोर्च्या काढण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ जुन्नर तालुका यांनी केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जुन्नर तालुक्यात २१ गट प्रवर्तक व ३६५ आशा स्वयंसेविका कार्यरत आहे.

अन्यथा १ ऑगस्ट पासून जुन्नर पंचायत समिती कार्यालयावर काढणार मोर्चा

जुन्नर तालुक्यातील गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचा संघटनात्मक मेळावा सावतामाळी मंदिर सभागृह आळेफाटा (ता.जुन्नर) या ठिकाणी संपन्न झाला. या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघांचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड निलेश दातखिळे व तालुका अध्यक्ष मंजुश्री पानसरे,तालुका सचिव लता शिंदे, तालुका उपाध्यक्ष सुरेखा तांबे व गटप्रवर्तक सोनल आल्हाट उपस्थित होते. मेळाव्यात निलम कुटे,आरती जोरी,योगिता औटी, मिना कणसे, सुरेखा तांबे व तालुक्यातील अनेक आशा वर्कर उपस्थित होत्या. अशी माहीती कॉम्रेड निलेश दातखिळे राज्य उपाध्यक्ष यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *