दुचाकी व पिकअप च्या धडकेत एक ठार एक जखमी…

प्रतिनिधी-कैलास बोडके

कल्याण नगर महामार्गावरील पिंपरीपेंढार (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल रानबाबा समोर ता.१९ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि पिकअप टेंपोची भीषण धडक होऊन दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला असल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली आहे.
सदरच्या अपघातात दुचाकी (एम एच १४ बी यु ८४८७) वरील राजेश संजू दहेकर (वय २२) रा.जाचकवाडी, ता.अकोले,जि. अहमदनगर मूळ रा.बोरी ता.चिखलदरा जि. अमरावती हे जागीच ठार झाले तर जितेन देविदास राजनकर सध्या रा.जाचकवाडी मुळगाव वझर ता.अचलपूर जि अमरावती हे या अपघातात गंभिर जखमी झाले आहेत.पीकअप टेंपो( एम एच १४ ए झेड ०९ ६८) ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा अक्षरशः चक्का चूर झाला आहे.या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस घटनास्थळी त्वरेने दाखल झाले होते. या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बी. बी. तळपे हे करीत आहेत.

Advertise

चौकटीत—-
पीकअप चालकांना आवर घाला.

नगर कल्याण महामार्गावर धावणारे पीकअप टेंपो हे नेहमीच वेगवान असल्याचे निदर्शनास येते.रस्ते वहातुक नियमांचा भंग करून अति घाईने ओहरटेक करताना पिकअप टेंपोने अपघात केल्याची असंख्य उदाहरणे आहेत.तसेच अपघातात निष्पाप प्रवाशांचे बळी जाण्याचे प्रकार वाढीस लागल्यामुळे या पीकअप चालकांना पोलिसांनी आवर घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.