सिन्नरनजिक खासगी बस आणि ट्रक यांच्यात धडक; १० जणांचा जागीच मृत्यू

दि. १३/०१/२०२३
नाशिक

नाशिक : मुंबई येथून शिर्डीकडे जाणाऱ्या गाईड ट्रॅव्हल्स या कंपनीच्या खाजगी आराम बस व ट्रकची आज पहाटे सिन्नर नजिक पाथरे गावाच्या हददीत समोरासमोर धडक होऊन १० जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून या अपघाताबाबत जाहीर दु:ख व्यक्त केले असून मृतांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर, ठाणे, अंबरनाथ परिसरावातील भाविक १५ बसेसमधून शिर्डी येथे साईदर्शनासाठी निघाले होते. या बसच्या ताफ्यापैकी एका बसला हा अपघात झाला आहे. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाका या दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ बस आणि ट्रक यांच्यात ही धडक झाली. हा अपघात एव्हढा भीषण होता की बसची एका बाजू पूर्णपणे कापली गेली; आणि १० जणांचा जागीच मृत्यू झाला. १७ पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले. जखमींना सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

अपघातापूर्वी बसेस चहापाण्यासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी अनेक प्रवाशानी सीटस बदलल्यामुळे मृतांची ओळख आणि जखमींची नावे समजण्यास विलंब होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *