इंद्रायणी थडी : तीन दिवसांत साडेतीन कोटींहून अधिक उलाढाल

महिला बचत गटांमध्ये उत्साह, प्रेक्षकांच्या गर्दीला उधाण.
आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमांनी महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना संधी या हेतूने सुरू केलेल्या ‘ इंद्रायणी थडी- २०२३ ’ महोत्सवाला पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातून प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढला आहे. सुरुवातीच्या तीन दिवसांत तब्बल २० लाखहून अधिक नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली असून, साडेतीन कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती समन्वयक संजय पटनी यांनी दिली.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरी येथील गावजत्रा मैदानावर एकूण १७ एकर जागेत भव्य इंद्रायणी थडी- २०२३ महोत्सव सुरू झाला. गेल्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे महोत्सव झाला नाही. त्यामुळे यावर्षी महोत्सवाला प्रचंड गदी पहायला मिळत आहे.
महोत्सवात एकूण १ हजार महिला बचतगटांनी विविध स्टॉल लावले आहेत. खाद्य पदार्थ, सौंदर्य प्रसाधने, जीवनावश्यक वस्तू, खेळणी, पुस्तक स्टॉल, घरगुती वापरासाठी विविध छोटी यंत्रे, पर्यावरण पुरक वस्तू, कपडे, परंपरीक पोषाख, यासह विविध १५० प्रकारच्या स्टॉलवर ग्राहकांनी खेरदीला पसंती दिली आहे. खाद्य पदार्थ्यांच्या स्टॉलवरील उलाढाल लक्षवेधी असून, बचत गटांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे, सवलतीच्या दरामध्ये पिण्याचे पाणी अर्थात वॉटर बोटल्स उपलब्ध आहेत. आईस्क्रीम आणि कुल्फीसह ज्यूसच्या स्टॉलवर बच्चे कंपनींची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

सेलिब्रेटीं’मुळे महोत्सवाची राज्यभरात चर्चा…
‘इंद्रायणी थडी- २०२३’ महोत्सवाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्ती उपस्थित होते. भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह आजी-माजी खासदार, आमदार, राजकीय पदाधिकारी यांनी महोत्सवाला भेट देत आहेत. तसेच, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चर्चेत आलेला पैलवान सिकंदर शेख यांच्यासह कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. दुसरीकडे, मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री, स्वप्नील जोशी यांच्यासह प्रथमेश परब, मराठी सिनेतारखा, चला हवा येवू द्या, महाराष्ट्राचे विनोदवीर अशा विविध ‘सेलिब्रेटीं’मुळे इंद्रायणी थडी- २०२३ महोत्सवाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *