बाळासाहेबांच्या शिवसेनेत महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश

दि. १३/०१/२०२३
पिंपरी

 

पिंपरी : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरातील 60 महिलांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने, विचाराने प्रेरित होवून कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दररोज पक्ष प्रवेश होत आहेत. शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संघटन मजबूत होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेला कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा पूनम वाघमारे, सुरेखा कुंभार, सोनाली पाटील, सुरेखा निकम, कोमल निकम, वर्षा तायडे, आशिया मुल्ला, आशिया शेख, माया शिरसाट, शारदा जाधव, सुवर्णा पवार, दीपा पवार, सविता पार्टे, मोहिनी गणगे, पल्लवी कांबळे यांनी जाहीर प्रवेश केला.

यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे, चिंचवड विधानसभाप्रमुख सुरेश राक्षे, जिल्हा संघटिका शैला पाचपुते, शहर संघटिका सरिता साने, जिल्हा उपसंघटिका शारदा वाघमोडे, चिंचवड संघटिका आशा इंगळे, माऊली जगताप, प्रदीप दळवी, महेश कलाल, अश्विनी खंडेराव, निलेश खंडेराव, कल्याण पांचाळ, नामदेव घुले, निखिल येवले, माऊली घोगरे, सुनील पाथरमल आदी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *