भाजप च्या नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांच्या मुलाची स्वतःवर गोळी मारून आत्महत्या…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

चिंचवड: दि २८ मार्च २०२१
पिंपरी चिंचवड च्या भाजप च्या नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे व सामाजिक कार्यकर्ते शेखर भाऊ चिंचवडे यांचे चिरंजीव प्रसन्ना (वय-२१) याने वडिलांचे पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. घटने नंतर त्याला आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आत्महत्तेचे कारण अजूनही अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहे.

प्रसन्ना मित्र मंडळींमध्ये आवडता मित्र होता. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायचा. त्याला अजून एक भाऊ आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. चिंचवड वाल्हेकरवाडी रस्त्यावर चिंचवडे यांचे एकत्र कुटुंब आहे. सर्वजणांनी रात्रीचे भोजन एकत्र केले आणि त्यानंतर प्रसन्न वरच्या मजल्यावर गेला. साडेनऊ च्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगण्यात येते. घटना घडल्यानंतर तत्काळ त्याला बिर्ला रुग्णालयात दाखल केले, पण तत्पूर्वीच तो मृत झाला होता. या घटनेमुळे नातेवाईक व चिंचवडे परिवार शोकाकुल आहे. रुग्णालयात मोठ्या संख्येने नगरसेवक, कार्यकर्ते , आणि नागरिकांनी गर्दी केली होती.