सहारा वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी दिशा सोशल फाउंडेशन कडून मदतीचा हात

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३१ ऑक्टोबर २०२२

पिंपरी


सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपले वेगळेपण जपणाऱ्या पिंपरी चिंचवड येथील दिशा सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज ( रविवारी) मावळ तालुक्यातील कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमास भेट दिली. निराधार आजी आजोबांसाठी असलेल्या या आश्रमाचे पक्के बांधकाम सुरू असून वीट व खडी घेण्यासाठी दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश आश्रमाचे अध्यक्ष विजय जगताप यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच फाऊंडेशन चे माजी अध्यक्ष गोरख भालेकर यांनी आश्रमासाठी १० पोटी सिमेंट आश्रमाच्या कामासाठी दिले.

यावेळी दिशा फाऊंडेशन चे माजी अध्यक्ष गोरख भालेकर, पदाधिकारी संतोष निंबाळकर , गुरुदास भोंडवे , संतोष बाबर, राजू कर्पे,नंदू कांबळे,आदी यावेळी उपस्थित होते. प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *