आणि ….जनतेसाठी आमदार महेश लांडगे भडकले

रोहित खर्गे
विभागीय संपादक
६ डिसेंबर २०२१

निगडी


यमुनानगर निगडी प्रभागात शहरातील सर्वात जास्त डोकेदुखीचा प्रश्न असेल तर तो महावितरणाच्या गलथान कारभाराचा. गेली दोन वर्षे येथील नागिरीकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. असा क्वचितच एखादा आठवडा असेल की जेव्हा सलग आठ दिवस वीज पुरवठा या प्रभागात सुरळीत सुरू आहे . या ठिकाणी राहणारे नागरिक हे मध्यमवर्गीय व कामगार वर्ग आहे. येथे वर्क फ्रॉम होम असलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांना या विजेच्या खेळखंडोबा मुळे प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. येथील सर्वपक्षीय नगरसेवकांनी अनेकदा निवेदने आणि वेळप्रसंगी नगरसेवक प्राध्यापक उत्तम केंदळे यांच्या पुढाकारातून वीज वितरण कार्यालय मोर्चाही नेला होता. पण गेंड्याची कातडी असलेल्या अधिकार्‍यांवर त्याचा काही परिणाम झाला नाही आणि अखेर दोन वर्ष संघर्ष करूनही विजवीतरण चे काम सुरळीत सुरू होत नव्हतं तेव्हा मागील सहा महिन्यापूर्वीही भोसरीचे आमदार महेश लांडगे स्वतः येऊन अधिकाऱ्यांना समज दिली होती.परंतु या आधिकऱ्यांवर कुठलाही परिणाम झाल्याचे दिसले नाही.

महावितरण अधिकारी झोडगे हटाव यमुनानगर बचाव- प्रा.उत्तम केंदळे

त्याच दरम्यान प्राध्यापक उत्तम केंदळे यांनी यमुनानगर मध्ये असलेले जेवढे व्हाट्सअप ग्रुप आहेत त्या ग्रुप वर महावितरणचे चे मुख्य कार्यालय रास्ता पेठ मध्ये आहे तेथील उच्च अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबरच ग्रुपवर टाकला आणि सर्वांना सांगण्यात आले की तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला फोन करून तुमच्या अडचणी सांगा. त्याप्रमाणे प्रचंड फोन कॉल त्या अधिकाऱ्याला गेल्यानंतर प्रचंड मानस्तपाला सामोरे जावे लागले होते. त्यांनी स्वतः सांगितले की मी कामात लक्ष घालतो आणि वीज पुरवठा सुरळीत करून देतो. परंतु त्यानंतरही या भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही आणि ही डोकेदुखी वाढतच गेली. त्यादरम्यान जेव्हा काही मोठा बिघाड होत असे तेव्हा येथील स्थानिक नगरसेवक व कार्यकर्ते विजवीतरण कर्मचाऱ्यांना मदतीला धावून जात असे.

पण त्यानंतरही महावितरण प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे निगडीतील या विजेचा लपंडाव सुरूच राहिला व नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत राहिला. सध्या शाळा ऑनलाईन सुरू आहेत त्यांचा अभ्यास आणि ऑनलाइन वर्क फ्रॉम होम काम करणाऱ्या युवकांच्या कामावर याचा परिणाम होत आहे. काही भागात तर सलग दोन दिवस वीज गायब होती यामुळे येथील स्थानिक सर्वपक्षीय नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व सचिन चिखले यांनी आमदार महेश लांडगे यांना पुन्हा पाचारण केले महावितरण अधिकारी झोडगे हटाव यामुनानगर बचाव अशी मोहीम सुरू केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि सर्व नागरिकांच्या समोरच आमदार लांडगे यांनी अतिशय क्रोधीत होऊन महावितरण अधिकाऱ्यांना नुसत्या माना हलवू नका, उद्धटपणे उत्तरे देऊ नका, तुमच्या अशा वागण्याने युवकांच्या नोकऱ्या जातील असे खडे बोल सुनावले. आणि पंधरा दिवसात सगळे सुरळीत करण्याचे आदेशच दिले.

अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात हे सगळ्या समस्यांचे निवारण करू आणि सुरळीत वीज पुरवठा सुरू करून देऊ असे आश्वासन दिले त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना व नागरिकांना आमदार महेश लांडगे यांनी शांत केले. आता येणारा पुढील काळच सांगेल की येथील वीज पुरवठा सुरळीत होतो की पुन्हा येरे माझ्या मागल्या असेच चित्र पाहायला मिळते. पण खरोखरच येथील नागरिकांच्या संयमाचे कौतुक करायला हवे.

 

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *