महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल

दि. ११/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील आयुक्तांच्या कामकाजामध्ये महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुन्हा एकदा फेरबदल केला आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त क्रमांक एक प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे सर्वाधिक जास्त १६ विभाग देण्यात आले असून जितेंद्र वाघ यांच्याकडे १४ आणि उल्हास जगताप यांच्याकडे १२ विभाग सोपविण्यात आले आहेत.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी आयुक्त शेखर सिंह यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजात बदल केला होता. मंगळवारी आयुक्तांनी पुन्हा यामध्ये फेरबदल केले आहेत.

अतिरिक्त आयुक्त एक प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे उद्यान व संवर्धन, अग्निशमन,शिक्षण, माध्यमिक शिक्षण, स्थापत्य उद्यान, अतिक्रमण, विद्युत मुख्य कार्यालय, पाणीपुरवठा, जलसंधारण, जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर 23, मध्यवर्ती भांडार, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, स्थापत्य मुख्य कार्यालय, समाज विकास, सर्व क्षेत्रीय कार्यालये व त्या अंतर्गत अंतर्गत येणारे सर्व विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन असे 16 विभाग सोपविण्यात आले आहेत.

दुसऱ्या क्रमांकाचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय, क्रीडा, स्थापत्य प्रकल्प, वैद्यकीय मुख्य कार्यालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, आरोग्य, आकाशचिन्ह परवाना विभाग, निवडणूक, व जनगणना, भूमी आणि जिंदगी, पर्यावरण अभियांत्रिकी, कायदा आणि बी आर टी एस प्रकल्प असे 14 विभाग सोपविण्यात आले आहेत.

तिसऱ्या क्रमांकाचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे सुरक्षा, कार्यशाळा, नगरसचिव, माहिती व जनसंपर्क, झोपडपट्टी नियंत्रण पुनर्वसन, आयटीआय मोरवाडी व कासारवाडी, नागरी सुविधा केंद्र, अभिलेख कक्ष, बी एस यु पी, ई डब्ल्यू एस प्रकल्प, स्थानिक संस्था कर आणि कामगार कल्याण असे 12 विभाग सोपविण्यात आले आहेत.

अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वारंवार फेरबदल होत असल्याने त्यांना आपल्या कामकाजामध्ये पूर्ण क्षमतेने लक्ष देणे शक्य होईल का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला असून आयुक्त शेखर सिंह जांभळे पाटील यांच्यावर जास्त मेहेरबान आहेत की अन्य दोघांवर नाराज अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *