हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुणे येथील घरावर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

दि. ११/०१/२०२३
पुणे


पुणे : महाविकास आघाडीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुणे येथील घरावर बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाने छापे घातले आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपचे ‘भ्रष्टाचार भंजक’ किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई केल्यामुळे सोमय्यांनी आरोप केलेल्या प्रकरणामुळे ही कारवाई झाली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले आरोप थोडक्यात असे आहेत. गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांच्या ब्रिक्स इंडीया कंपनीला विकण्यात आला असून ती कंपनी बंगाल येथील आहे. कंपनी बंद अवस्थेत असून या बंद कंपनीच्या खात्या कारखान्याचे पैसे ठेवण्यात आले. कारखाना विकताना कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने योग्यप्रकारे काम केले नाही.सोमय्या यांच्या आरोपांमध्ये कितपत तत्थ्य आहे कालांतराने स्पष्ट होईल. मात्र, आता हसन मुश्रीफ यांचे समर्थक कागलमध्ये आक्रमक झाले असून कागल बंदची हाक देण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *