विद्यार्थ्यांनी समाजामध्ये मतदान जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जोपासावी-प्राचार्य डॉ.शर्मिला चौधरी

मंगेश शेळके
प्रतिनिधी
२५ जानेवारी २०२२

ओझर


पिरंगुट ता.मुळशी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयाचे वतीने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये मतदान व मतदान प्रक्रिये संदर्भात मार्गदर्शन करून विद्यार्थी व सर्व शिक्षक बांधवांनी मतदाना विषयी सामूहिक शपथ घेऊन एक राष्ट्रीय सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व परिसरात रॅलीचे आयोजन करून मतदारांमध्ये जनजागृती केली.

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शर्मिला चौधरी, उप प्राचार्य डॉ.प्रविण चोळके, डॉ.महेंद्र अवघडे,तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.श्रीकांत देशमुख,डॉ.संगिता भालेराव, प्रा.संजय मोरे,प्रभारी कार्यालयीन अधीक्षक रविंद्र जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चौधरी सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.सोनवणे सर यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *