महापालिका कर्मचारी यांना दसऱ्यालाच मिळाली दिवाळी भेट

पिंपरी चिंचवड
०७ ऑक्टोबर २०२२


‘श्रीमंत’ समजल्या जाणा या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तब्बल ७ हजार ८४ अधिकारी व कर्मचान्यांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीसाठी ८.३३ टक्के बोनस व २० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. ती एकूण रक्कम तब्बल ६० कोटी इतकी आहे. कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षक व बालवाडी शिक्षकांना देखील हा लाभ दिला जाणार आहे.

सन 2021-22 या आर्थिक वर्षात कार्यरत व सध्या निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांनाही मिळणार लाभ

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी बोनस व सानुग्रह अनुदानाबाबत गुरुवारी (दि.६) आदेश काढला आहे. औद्योगिक कायद्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ व महापालिका यांच्यात सन २०२०-२१ मध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस व २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत ५ वर्षांचा करार झाला आहे. त्यानुसार, हा बोनस दरवर्षी दिला जातो. महापालिका आस्थापनेवर सुमारे सात हजार ८४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. तर बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संख्या सुमारे दीड हजार आहे. पालिकेतील सर्व वर्ग १ ते ४ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच, रजा राखीव वैद्यकीय अधिकारी व रजा राखीव परिचारिकांना ८.३३ टक्के प्रथा बोनस व २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. याचा लाभ पालिकेत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, राखीव नर्सेस, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, समूहसंघटक यांना होणार आहे. बोनस व सानुग्रह अनुदानाची रक्कम सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळेल याची दक्षता घ्यावी. त्याबाबतची बिले तयार करून तातडीने लेखा विभागाकडे सादर करावीत, असे आदेश आयुक्त सिंह यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *