अस्मिताताई व गणेशभाऊ कवडे यांच्यावतीने मोफत मास्क,सॅनिटायझरचे वाटप…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि.१६ मे २०२१
(ओझर): अध्यात्मातील ज्येष्ठ कीर्तनकार, शिवनेरभूषण वै.ह. भ. प. विठ्ठलबाबा मांडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाच्या औचित्याने युवा सेनेचे राज्य विस्तारक, अश्वमेध युवा मंचाचे संस्थापक व श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गणेशभाऊ कवडे आणि ओझरच्या प्रथम सरपंच अस्मिताताई कवडे यांनी मोफत N 95 मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. Covid-19 च्या जागतिक महामारीमध्ये या भयंकर संकटाला सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे .मात्र यामध्ये विशेषत्वाने आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवत आहेत त्यामुळेच अस्मिताताई व गणेशभाऊ यांनी जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथील कोविड सेंटर मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टर्स परिचारिका व वार्डबॉय, शिक्षक स्टाफ, आशा वर्कर्स, सफाई कर्मचारी ,ॲम्बुलन्स कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना N 95 मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले केले.
यावेळी श्री.विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे
अध्यक्ष .बी.व्ही(अण्णा)मांडे,उपाध्यक्ष रंगनाथदादा रवळे, सचिव .आनंदराव मांडे,लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट चे सचिव.जितेंद्र बिडवई,अश्वमेघ चे उपाध्यक्ष. संदीपभाऊ ताजने,लेण्याद्री कोविड सेंटरचे डॉ.मंगेश काळे,डॉ.कानडे,.बाळासाहेब मोहकर,.गणेश डबडे, शरद पंडित,नरसिंग कोळी, गौरव तळपे,तेजल भवारी,वनिता,पल्लवी भुरकुंडे,डिंपल लांडे, अर्चना भुजबळ,प्रियांका शिरसाट,
जुन्नर तहसीलचे कर्मचारी नवनाथ पानसरे,हर्षवर्धन कुर्हे,दिलीप भगत,शिवराज संगनाळे,पंकज भगत, सचिन पांडे,विकास भगत,विक्रम गायकवाड, विघ्नहर् देवस्थान चे व्यवस्थापक गणेश टेंभेकर, शेखर कवडे आनंद विजय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *