अब्दुल सत्तारांपाठोपाठ संजय राठोड मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता

२७ डिसेंबर २०२२


शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अब्दुल सत्तारांपाठोपाठ आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील सावरगाव येथील जमीन खासगी व्यक्तीला विकली, असा आरोप विरोधकांनी केला आहे. याशिवाय वाशिमचे जिल्हाधिकारी आणि मंगळूरपीरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नाही, असं सांगितलं असताना देखील संजय राठोडांनी जमीन विकली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आजच्या नागपूर अधिवेशनात महाविकास आघाडीचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *