ही तर अफझल, औरंग्याच्या विचारांची अवलाद; शिवसेनेची शिंदे गटावर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होते. त्यानंतर आयोगाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला नव्या नावांचे वाटप केलं. त्यानुसार उद्धव ठाकरेंना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’, या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली आहे.

मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवट्यामागे भ्रष्ट, बेइमान गेंड्याची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल. छे छे! यांना जाळायचे कसे? ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे! त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील! हे राज्य श्रींचे आहे. शिवरायांचे आहे. शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार?, अशा शब्दांत एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांवर शिवसेनेने टीका केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *