कोरोनाची चिंता नाही; जल्लोषात करा नववर्षाचं स्वागत – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

२७ डिसेंबर २०२२


देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, कोरोनाला महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. आपल्याला धोका पत्कारायचा नाही, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. तुम्हीही कोरोना नियमांचं पालन करत ख्रिसमस, वर्षाअखेर आणि नवीन वर्षाचं धुमधडाक्यात साजरा करा. तसेच पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्सवर कोणतेही नवीन निर्बंध जारी केलेले नाहीत. उत्सवाबाबत आम्ही हॉटेल मालकांच्या बैठका घेतल्या आहेत आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी, आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *