सुषमा अंधारे यांची राणे पिता-पुत्रांवर टीका

१६ नोव्हेंबर २०२२


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह त्यांची दोन मुलं निलेश राणे आणि नितेश राणे हे अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राणे पिता-पुत्रांनी अनेकदा उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या घडामोडींनंतर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर टीका केली आहे.

राणे पिता-पुत्रांवर टीकास्र सोडताना सुषमा अंधारे म्हणाल्या, नारायण राणेंची जी दोन बारकी-बारकी पोरं आहेत, त्यांनी अनेकदा मातोश्रीवर टीका केली. मी बारक्या लेकरांबद्दल फार काही बोलत नसते. अजिबात बोलत नसते. पण ती जी दोन बारकी-बारकी लेकरं आहेत ना… त्यांनी उंची नसताना मातोश्रीवर गरळ ओकली आहे. मी त्यांच्या बौद्धिक उंचीबद्दल बोलतेय. पण देवेंद्र फडणवीसांची त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत झाली नाही” अशी टीका अंधारे यांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *