नारायणगांव
दि.०५/०८/२०२३
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून क्रांती दिनानिमित्त ‘रक्तदान शिबीर’..चे नारायणगाव येते मुक्ताई हॉलमध्ये आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली नारायणगाव आणि परिसरातील नगरीतील नागरिकांनी मोठ्याप्रमाणात या रक्तदान शिबिराचा लाभ घेतला सोबतच रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यास ६ लाखांचे सुरक्षा कवच व प्रमाणपत्र आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. ग्रामपंचायत सदस्य रामदास अभंग यांनी केले त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचे आभार नारायणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रोहिदास केदारी यांनी मानले.
या कार्यक्रमाला विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली यामध्ये युवा नेते अमित बेनके मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे,अशोक पाटे, सुरज वाजगे, गणेश वाजगे, रोहिदास केदारी तानाजी डेरे,विलास पाटे विठ्ठल औटी दुर्गशेठ बेल्हेकर, शंकरराव कोल्हे, नानाजी वाजगे, रमेश मेत्रे राजेंद्र कोल्हे रामदास अभंग, सागर दरंदळे, संजय फल्ले, किरण कुमार ढवळपुरीकर, अजित वाजगे, शशिकांत वाजगे, अनिल थोरात,रामदास पाटे स्वप्निल डेरे,पप्पु रसाळ,अरुण पाटे,शंकर जाधव, माछिन्द्र डोके, अतुल आहेर,नितीन कोल्हे, संदेश केदारी, तुळशीदास कोऱ्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.