आजपासून पुण्यात अग्रोदय महाअधिवेशन

पुणे : अखिल भारतीय अग्रवाल संमेलनातर्फे संपूर्ण भारतातील विविध राज्यांतील अग्रवाल समाज बांधवाना जोडण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी,पुण्यातील डेक्कन कॉलेज ग्राऊंड, येरवडा येथे आज आणि उद्या दिनांक 24 ते 25 डिसेंबर रोजी अग्रोदय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार असून यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे ,अभिनेत्री वर्षा उसगावकर, पद्मिनी कोल्हापुरे, प्रसिध्द उद्योगपति कृष्णकुमार गोयल (कोहिनूर ग्रूप ) , जयप्रकाश गोयल(गोयलगंगा ग्रूप ), ईश्वरचंद गोयल (पुणे अग्रवाल समाज अध्यक्ष), सुनिल अग्रवाल ( चिंचवड अग्रवाल समाज अध्यक्ष), नितीन अग्रवाल उपस्थित राहणार आहेत. मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. उज्जवल पाटणी हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

आज शनिवारी महिला अधिवेशन, युवक अधिवेशन, व्यवसाय अधिवेशन, व्यापार / उद्योग भव्य प्रदर्शन, अग्रवाल गॉट टॅलेंट एंटरटेनमेंट आणि रविवारी मुख्य प्रांतीय महाअधिवेशन व अग्रपुरस्कारांचे वितरण आणि चर्चासत्र होणार आहे.

अग्र-माधवी महिला अधिवेशनामध्ये आगामी काळात येणारे विषय जसे की, लग्नाला होणारा विलंब, आर्थिक स्वावलंबनाला दिशा देणे, सामाजिक, कौटुंबिक बदलांच्या युगात कुटुंबांची एकता अबाधित ठेवणे, महिलांना व्यवसाय व इतर क्षेत्रात माहिती व सहकार्य देणे, धार्मिक भावना जपणे, अशा अनेक दूरगामी विषयांवर चर्चा करून सातत्यपूर्ण प्रक्रिया सुरू करणे हा या महिला संमेलनाचा मुख्य उद्देश असेल.
अग्रवाल युवासेना अधिवेशनामध्ये तरुणांना व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देणे, विविध यशस्वी अग्रवाल व्यावसायिकांशी चर्चासत्रे, आधुनिक यशस्वी व्यवसाय पद्धतींची माहिती देणे आणि अग्रवालांमधील व्यवसाय वाढवणे, या सर्व विषयांवर युवा संमेलनात चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

तसेच विविध श्रेणींमध्ये अग्रगण्य पुरस्कारांचे वितरण या संमेलनात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *