भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला भीषण अपघात, गाडी ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली

२४ डिसेंबर २०२२


भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला आहे. फलटणमध्ये त्यांची कार पुलावरून ३० फूट खाली कोसलळली त्यामुळे हा अपघात झाला. अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. गोरेंचे स्वीय सहाय्यक आणि ड्रायव्हरालाही दुखापत झाली आहे.

चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे.त्यांना आधी साताऱ्यातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आलं.विशेष अॅम्ब्युलन्समधून त्यांना पुण्यात आणण्यात आलं. रुबी रुग्णालयातील एमर्जन्सी वॉर्डमध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *