गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा नवा विक्रम; १५६ जागांवर ऐतिहासिक विजय

०९ डिसेंबर २०२२


गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आतापर्यंतचे सारे विक्रम मोडीत काढत विजयाची सप्तपदी पूर्ण केली. १८२ जागांपैकी १५६ जागा भाजपने जिंकल्या आहे. मागील वेळी ७८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी मात्र दारुण पराभव पत्करावा लागला. त्यांना अवघ्या १७ जागाच मिळविता आल्या; तर आम आदमी पार्टीला केवळ ५ जागा मिळविता आल्याने त्यांचा दिल्ली पॅटर्न निष्प्रभ ठरला आहे.

गुजरातमधील विधानसभेच्या १८२ जागांपैकी भाजपने १५६ जागा जिंकल्या आहेत. २०१७ च्या तुलनेत ५८ जागा वाढल्या आहेत. काँग्रेसला सर्वाधिक ६१ जागांचे नुकसान झाले आहे.

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला केवळ ५ जागा जिंकता आल्या. त्यांचे तिन्ही मोठे नेते निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी, प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि पाटीदार नेते अल्पेश कथिरिया यांचा समावेश आहे. असे असतानाही मतांच्या आधारे ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आता पक्षाला देशभरात आपले नाव आणि चिन्ह घेऊन लढता येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *