भूखंड घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा

२२ डिसेंबर २०२२


भूखंड घोटाळ्यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत घेरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री असताना न्यासाची ८६ कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या २ कोटी रुपयात दिली, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर विरोधकांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

याप्रकरणी नागपूर खंडपीठाकडून भूखंड प्रकरणात एकनाथ शिंदेंना दिलासा देण्यात आला आहे. आता यावर पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना हा सर्व व्यवहार नियमानुसार जमिनीचा व्यवहार झाला आहे. कोर्टाने या व्यवहारावर कोणतेही ताशेरे ओढले नाहीत असं शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *