पिंपरी चिंचवड शहरामध्ये गरभा व दांडियाची धूम

पिंपरी प्रतिनिधी
०३ ऑक्टोबर २०२२


नवरात्रोत्सवामुळे शहरभरात सर्वत्र उत्सवाची धामधूम आहे . रात्री आठनतर मंडळे सोसायट्यांमध्ये आणि आयोजित दांडियामुळे नवरात्रीचे रंग अधिकच गडद होत आहेत . डीजेच्या तालावर तरूणाईची पावले थिरकत आहेत . ग्रुप परफॉर्मन्ससाठी दांडियाचा ड्रेस व दागिने खरेदी करण्यासाठी तरुणाईची लगबग दिसून येत आहे . दांडिया – गरब्यामुळे आनंदोत्सव म्हणजे न्हावून निघायला सुरुवात झालीय शिगेला पोहोचणाऱ्या तरुणाईच्या जल्लोषाचं वैशिष्ट्य नवरात्रीचा बदलत चाललेला ट्रेंड यामध्ये स्पर्धा , बक्षिसे अशा कितीतरी गोष्टींची भर पडली आहे . त्यामुळे अवघ्या तरुणाईला साद घालणारा हा उत्सव आता भरात आलाय . त्यातयुवक – युवतींची चाललेली जय्यत तयारी तर विचारायलाच नको . ‘ डीजे’च्या तालावर तरुणाईचा जल्लोष तरुणाईबरोबरच आता लहान मुलांपासून अगदी मध्यमवयांपर्यंतच्या सर्वांचा दांडिया म्हणजे आकर्षणाचाविषय झाला आहे . डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी लागलेली उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

ड्रेस,दागिने, दांडिया खरेदी साठी ग्राहकांची लगबग

दांडिया खेळण्यासाठी चौकात , मोकळ्या ठिकाणी दांडियाचे आयोजन केले आहे . दुसरीकडे दांडिया आणि त्यासाठी लागणारे ड्रेस , दागिनेखरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजार पेठेतील दुकानात आपल्याला हव्या असलेल्या बस्तूंची शोधाशोध करताना दिसत आहे . दांडिया परप्रांतीय असला तरी आज महाराष्ट्रात चांगलाच रुजला आहे . त्यामुळे आता अलीकडे दांडियाचा सोलो परफॉर्मन्स , ग्रुप परफॉर्मन्स स्पर्धा प्रचलित होत आहे . ड्रेसकोड यामध्ये ग्रुप दांडिया असेल , तर सगळ्यांचा ड्रेस कोड ठरविला जातो . तसेच दागिने , टिपऱ्या यांच्यात साम्य असावे लागते . आणि ही सगळी जमवाजमव करताना कशातही उणीव राहता कामा नये असे प्रत्येकाला वाटते.

दांडिया खेळण्यासाठी आता तरुणांबरोबरच काही हौशी लोकांचे ग्रुपदेखील सहभागी होताना दिसतात . या सर्वांची गरज पूर्ण करण्यासाठी शहरातील काही दुकानदारांकडे नवरात्रीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दालनच असते . शहरातील ठराविक ठिकाणी मोठमोठ्या मंडळांकडून येणाऱ्या दांडिया कार्यक्रमात रात्री आठनंतर वातावरणात दांडियाच्या गाण्याचे स्वर उमटू लागतात . पूर्वी दांडिया व गरबा खेळण्यात रात्र जागविली जायची मात्र , यावर आता मर्यादा आल्यामुळे रात्री अकरा किंवा बारापर्यंतच दांडिया खेळला जात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *