रोहित खर्गे, विभागीय संपादक
पिंपरी :- पिंपरी येथील श्री. संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या पिंपरी करंडक २०२० दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या शुभहस्ते व उपमहापौर केशव घोळवे,शिवसेना गटनेते राहुल कलाटे,माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक संदीप वाघेरे, माऊली थोरात, माजी नगरसेवक संतोष कुदळे यांच्या उपस्थितीमध्ये नवमहाराष्ट्र क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याविषयी अधिक माहिती देताना नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की,कै. योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या पिंपरी करंडक २०२० स्पर्धेमध्ये एकूण ४८ संघांनी सहभाग घेतला होता. अत्यंत उत्साही वातावरणात हे सामने खेळवले गेले. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १ लाख रुपये रावेत क्रिकेट संघ, रावेत यांनी पटकावले, द्वितीय क्रमांकाचे ५० हजार रुपयांचे पारितोषिक मृत्युंजय क्रिकेट संघ, तृतीय क्रमांकाचे २५ हजाराचे पारितोषिक प्रतीकदादा घुले,व चतुर्थ क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे पारितोषिक झुंजार क्रिकेट क्लब यांना मिळाले.
यावेळी युवा मंचच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रभाग क्रमांक २१ मधील नागरिकांना देण्यात येणार्या दिनदर्शिकेचे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच कोरोंना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे आपले कर्तव्य पार पाडणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा देखील “ कटिबद्ध जनहिताय कोविद योद्धा ” सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये वायसीएम रुग्णालयाचे डॉ. विनायक पाटील,डॉ.अभयचंद्र दादेवार,जिजामाता रुग्णालयाचे डॉ.संगीता तिरूमणी,डॉ.बाळासाहेब होडगर,सहा आरोग्यधिकारी संजय कुलकर्णी,अतुल सोनवणे, सिस्टर लोहार,जगताप,भजभुजे, गोरक्षक मंगेश नढे,कुणाल साठे,अभिजीत चव्हाण, अभिजीत शिंदे, आरोग्य कर्मचारी शांताराम कांबळे सामाजिक कार्यकर्ते भरत जमनांनी, अजय नायर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र वाघेरे, संदीप नाणेकर, अध्यक्ष हरिष वाघेरे, युवराज वाघेरे,किरण शिंदे,यांनी केले.