महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत नंदीबैलाला आहे विशेष स्थान

मंगेश शेळके 
१४ डिसेंबर २०२२

ओझर


गाव दानोरा बीड जिल्हा नगर येथून चिमाजी फुलमाळी , संदीप फुलमाळी , काळू काकडे व अजय फुल माळी हे कुटुंब व त्यांचा परिवार सध्या जुन्नर तालुक्यात गावागावात भटकंती करून ,लोकांचे मनोरंजन करून ,स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून , महाराष्ट्राच्या नंदीबैल या संस्कृतीचा गेले अनेक वर्षे ते प्रसार , प्रचार व जतन करीत आहे.नंदीबैल ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील संकल्पना मानली जाते. नंदी हा बैल शिवाचे वाहन समजला जातो. त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्याला विशेष स्थान आहे. नंदीबैलाला महाराष्ट्रात काही भागात पांगुळ बैल असेही म्हणतात .त्याला रंगवून , सजवून गावातील घरांच्या अंगणासमोर आणला जातो. त्यांच्यासोबत असतो लयदार आवाजातील संभळीचा सूर तर कधी पिपाणी तुंतुने किंवा ढोलकी वाजवली जाते.

” गुबू गुबू “अशा वाद्याच्या आवाजाची किनार वातावरणात तर आणखीनच रंग भरते. महाराष्ट्रात संस्कृती आणि जुन्या परंपरा जपणारे गोंधळी ,वासुदेव ,पिंगळा तसेच नंदीबैलवाले असे भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या जमाती आहेत. यांचे संस्कृतीचे जतन आणि टिकून ठेवण्याचा मोठा वाटा आहे. परंतु नंदीबैल ,गोंधळी ,वासुदेव व पिंगळा या लोकसंस्कृतीडे सरकारचे सध्या दुर्लक्ष होत आहे . सरकारने या लोकसंस्कृतीला एक प्रकारचा हात देऊन ,चालना देऊन महाराष्ट्राचे हे वैभव, ही संस्कृती जतन ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.बैलाचा खेळ दाखवून लोकांची करमणूक करून पोट भरणारी महाराष्ट्रातील ही जमात तमिळनाडू मधून महाराष्ट्रात आली .पश्चिम महाराष्ट्रात त्यांना ढवळा नंदीवाले म्हणतात , तर इतर भागात तिरमाळी व तिरमल म्हणतात. दिवाळी संपल्यानंतर माघ महिन्यापर्यंत त्यांची हि सफर गावागावात सुरू असते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *