दिल्ली विधानसभा सदस्यांची पुणे महापालिकेस भेट

प्रतिनिधी – सुहास मातोंडकर

दि.२२ डिसेंबर २०२२

पुणे


पुणे : दिल्ली विधानसभा आणि महापालिका अधिकारी यांच्या एका शिष्टमंडळाने पुणे महापालिकेला बुधवारी भेट दिली. या भेटीत त्यांनी कचरा व्यवस्थापन यंत्रणेची सविस्तर माहिती घेतली. या शिष्टमंडळात 14 जणांचा समावेश होता.

दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष सौरभ भारतद्वाज, सदस्य अजेश यादव, अखिलेशपती त्रिपाठी, श्रीमती अतिशी, दिनेश नोहनिया, कुलदीप कुमार, संजीव झा, शिवचरण गोयल, सोन दत्त दिल्ली महापालिकेचे अधिकारी व्ही. के.गुप्ता, मनोजकुमार वर्मा, रविंद्रकुमार वालेचा, सुनीलदत्त शर्मा, सुरेशकुमार यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. उपायुक्त सचिन इथापे, अजित देशमुख, आशा राऊत, सहायक वैद्यकीय अधिकारी केतकी घाटगे यावेळी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *