काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी, खाकी पॅन्ट घालून सभागृहात येतील – संजय राऊत

२९ डिसेंबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरातील रेशीमबाग इथल्या डॉ. हेडगेवार स्मृतीभवन इथे आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संघ विचारांचा रेशमी कीडा हा त्यांच्या कानात वळवळत आहे. काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी आणि हाफ पॅंट घालून येतील एवढ्या लवकर बदल होईल असं वाटलं नव्हतं. असं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे. तसेच काल पालिकेत सगळे नाही, काही मोजकेच गेले होते, मात्र जे गेले ते घुसखोरच आहेत. ते सगळीकडे घुसघोरी करत असतात पालिका कार्यालयं सील केली आहेत कशी केली गेली ही हुकूमशाही आहे. एकदा तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयात भाजपवाले कसे घुसतील हे लवकरच कळेल असं संजय राऊत म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *