पुणे पोलिसांची मोठी कारवाई; बनावट कॉल सेंटर उध्वस्त

१६ डिसेंबर २०२२

पुणे


पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबईतील बनावट कॉल सेंटर उध्वस्त केलं आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल आणि फसवणूक करण्यात येत होती. पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. कॉल सेंटरमधून फेक कॉल द्वारे लोकांना लुटलं जात होतं. मुंबईतील मुलुंडमध्ये हे कॉल सेंटर होतं. येथे ४३ जण काम करत होते. या कारवाईत चाळीस मोबाईल, सात हार्ड डिस्क व इतर साहित्य दत्तवाडी पोलिसांनी जप्त केलं.

आरोपी हे महाराष्ट्रातील विविध शहरातील नागरिकांना फोन कॉल द्वारे बजाज इन्श्युरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करायचे. ५० लाख रुपयांची पॉलीसी काढल्यानंतर झिरो टक्के व्याज दराने पन्नास लाख रुपयांचे लोन मंजुर करुन देतो, असे सांगून नागरीकांकडुन त्यांचे आधारकार्ड, कॅन्सल चेक, फोटो या गोष्टी व्हॉटसअॅपवरुन घेवुन लोनचे सहा महिन्यांचे प्रिमीयम २,५०,०००/- रुपये होत असल्याचे सांगत त्या पैकी १,२५,००० रुपये लोन प्रिमियम म्हणून भरण्यास भाग पाडले जायचे. त्यानंतर नागरिकांची आर्थिक फसवणूक व्हायची.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *