दि. १९/०१/२०२३
पिंपरी
पिंपरी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. 2014 मध्ये ठाकरे-भाजप युती तुटल्यानंतर मनसे भाजप युतीच्या चर्चा झाल्या.2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता.2019 मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर 2022 मध्ये फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढत गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं राज ठाकरे भाजपचा बोलघेवडा आहे. अशी टीकाही राज यांच्यावर करण्यात आली.
पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे सख्खा भाऊ पक्का वैरी झालाय. राज ठाकरे बिभिषण झाले आहेत का ? असा सवाल उपस्थित होतो. आता शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेंची या कायदेशीर लढाईत जर धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला किंवा गोठवला गेला तर ठाकरे गटाने प्लॅन बी तयार केलाय.नवीन चिन्ह मिळवण्यासाठी ठाकरे गट जनतेत जाणार आहे. ठाकरे जनतेला आणि शिवसैनिकांकडून चिन्ह सुचवण्याचे आवाहन करतील आणि जनतेतून आलेल्या चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेतले जाणार आहे. दरम्यान बंडखोरीने पोखरलेल्या शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरु असतानाच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नात्यावरील नाटकाचा प्रयोग होणार आहे. 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच निमित्तानं ‘बाळासाहेबांचा राज’ या नाटकाचा शुभारंभ होतोय.एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेचा वाद सुरु असतानाच राज ठाकरे यांच शिवसेना सोडण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कशा प्रकारचे नाते होतं. हे सांगणार नाटक सादर केलं जाणार आहे.
एकीकडे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला असताना आता बाळासाहेबांचा राज’ या नाटकातून नेमका काय नवा ट्विस्ट पाहायला मिळणार ? शिवसेनेला सुरुंग लागला तेव्हाच फडणवीस आपल्या खेळीत यशस्वी झाले. उद्धव ठाकरेंनी प्लॅन बी तयार करून ठेवलाय. राज ठाकरेंचा प्लॅन सी मध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळेल. मात्र यात शिंदे-फडणवीस काही गेम करणार का ? ब्रजभूषण सिंह जेव्हा पुणे दौऱ्यावर आले होते तेव्हा राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना याबद्दल न बोलण्याच्या सूचना दिल्या होत्या. मागच्या ४ महिन्यात राज ठाकरेंनी ४ ते ५ वेळा अशाप्रकारच्या सूचना दिल्या.शिवसेनेचं चिन्ह जेव्हा गोठवलं गेलं तेव्हा राज ठाकरेंना पदाधिकाऱ्यांना न बोलण्याचे आदेश काढले. बृजभूषण सिंहांच्या अयोध्या वादावर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास मनाई करण्यात आली.सुषमा अंधारेंनी केलेल्या टीकेचा वाद वाढल्यानंतर राज ठाकरेंनी न बोलण्याच्या सूचना केल्या. नंतर हर-हर महादेव सिनेमाच्या वादावरही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना न बोलण्याच्या सूचना दिल्या. पण हे असं सगळं करण्यामागे मास्टरमाईंड.देवेंद्र फडणवीस होते का ? असा सवाल उपस्थित होतो ?