श्रद्धा वालकर खून प्रकरण : आफताब पूनावालाचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज, उद्या सुनावणी

१६ डिसेंबर २०२२


श्रद्धा वालकर खून प्रकरणामुळे सगळा देश हादरला आहे. यातला मुख्य आरोपी आफताब पुनावाला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीनासाठी अर्ज केला आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आफताबने दिल्लीच्या साकेत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, आफताबने नार्को आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये आपला गुन्हा कबूल केला आहे.

श्रद्धाच्या खुनाविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतलं आणि त्याची नार्को तसंच पॉलिग्राफ टेस्ट केली. यामध्ये त्याने खुनाची कबुली दिली आहे. तसेच श्रद्धाचे तुकडे त्याने ज्या ठिकाणी टाकले होते, तिथे काही हाडे सापडली आहेत. ही हाडे श्रद्धाचीच असल्याचे काल फॉरेन्सिकच्या तपासणीत सिद्ध झाले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *