बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिक्रापूर : दि. 01/06/2021.
वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वच ठिकाणी कचरा समस्या निर्माण होत आहे. मात्र त्यावर अनेक ठिकाणी लगेच उपाययोजनाही झालेल्या आहेत. परंतु पुणे नगर हमरस्त्यावर अस असणाऱ्या शिक्रापूर ग्राम पंचायत चा मात्र, कचरा प्रश्न गेली कित्येक वर्षे मिटता मिटेना. दरवेळी येथील सरपंच, गावकारभारी व ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे देऊन, वेळकाढुपणा करताना दिसून आले आहे. आपला आवाज न्यूज नेटवर्कनेही, तीन वर्षांपूर्वी समक्ष येथे जाऊन बातमीचे वार्तांकन केलेले होते. त्यावेळच्या महिला सरपंच व ग्रामसेवकांनी वेळकाढुपणा केलेला आज दिसून येत आहे. कारण आजही येथील वेळ नदीपात्रातील कचऱ्याचे ठिकाण तसेच असून, उलट या कचऱ्यामुळे नदी चोरीला गेली की काय, असे नदीचे पात्र अरुंद बनविले असून, याला एथिल ग्राम पंचायत जबाबदार आहे. ग्राम पंचायतीने कचरा व्यवस्थापनासाठी जागा घेतलीय, पण तिचे नेमके पुढे काय झाले ? हे सर्वसामान्यांना काही कळेनासे झालेय. कारण कचरा तर अजूनही वेळ नदी पात्रातच दिसतोय, व त्या घाणीचे साम्राज्य तेथील राहिवास्यांच्या जीवावर उठलेय.
एखादा पाहुणा जर गावात आला, आणि त्याने वेळ नदीतल्या या कचऱ्याकडे पाहिले, तर तो गावाला नावे ठेवतोय. परंतु सत्तेत मस्त असणाऱ्या सदस्य, सरपंच व शासकीय प्रतिनिधी असणाऱ्या ग्रामसेवक व सत्तेत नसले तरीपण, या सर्वांकडून गावकारभार करवून घेणाऱ्या स्थानिक पुढारी नेत्यांना मात्र या कचऱ्याची दुर्गंधी इतके वर्ष येत नाही, याचे मात्र नागरिकांना फार विशेष वाटतेय.
या पत्रात काळे यांनी सांगितलेय की, शिक्रापूर मधील घरगुती कचऱ्या बरोबरच अनेक हॉटेल्स, दवाखान्यांचा घातक कचरा टाकला जातोय. तर रात्री अपरात्रीही रस्त्यावर व ग्राम पंचायत हद्दीत कारखान्यातील कचरा व शिक्रापुरच्या बाहेरचाही कचरा येत असल्याचा तक्रारी लोकांनी त्यांच्याकडे केल्याचे सांगीतलेय. त्यामुळे शिक्रापूरच्या कचऱ्याला अर्थ प्राप्त झालेले दिसून येतेय. त्यामुळेच की काय येथील कचरा प्रश्न मिटविला जात नसावा व त्यामुळे शिक्रापूरचे ग्रामस्थ याला हकनाक बळी पडत असल्याचे दिसते आहे.
याबाबत शिक्रापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती सेवा समितीचे शिरूर तालुकाध्यक्ष संतोष दशरथ काळे ( रा. काळे आळी, शिक्रापूर ) यांनी सुमारे 3 पानांचे पत्र व शिक्रापूर येथील तब्बल 210 लोकांच्या सहीचे असे एकूण 14 पानांचे पत्र, सोमवार दि. 31 मे 2021 रोजी शिक्रापूर ग्रामपंचायतला देत, जर येथील कचरा प्रश्न मिटला नाही, तर उपोषण करणार असल्याचा इशारा काळे यांनी दिलाय. तसेच या पत्राच्या प्रति जिल्हाधिकारी, CEO जी. प. पुणे, तहसिलदार, गटविकास अधिकारी, शिक्रापूर पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच थेट मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आलेय.
हे निवेदन शीक्रापूर ग्राम पंचयातचे ग्रामविकास अधिकारी बी बी गोरे यांना समक्ष दिलेय. त्यावेळी काळे यांच्यासोबत समितीचे तालुका कार्याध्यक्ष शरद टेमगिरे, तालुका युवा सेनेचे विजय लोखंडे, तालुका पतंजली योग समितीचे अध्यक्ष अंकुश घारे, सा. कार्यकर्ते तुषार आळंदीकर, जितेंद्र काळोखे, मंगेश चव्हाण, हरून इनामदार, स्वप्नील मांढरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच या तक्रारीवर काय काय कारवाई केली, याचा अहवाल विहित वेळेत मिळण्याची सूचना वजा विनंतीही या पत्राद्वारे शिक्रापूर ग्राम पंचायतला करण्यात आलीय. त्यामुळे आता या कचरा प्रश्नावर शिक्रापूर ग्राम पंचायत किती तत्परतेने कार्यवाही करतेय, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.