बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीस यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन

०६ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावमधल्या हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेकीमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फोन केला. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ झालेल्या घटनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात नाराजी आणि निषेध नोंदवण्यात आला. कन्नड संघटनांच्या या दगडफेकीनंतर कर्नाटक सरकारने कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण झालं. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं. तसंच महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असंही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केलं आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *