तनिष्क कुलकर्णीची भाजप सोशल मीडिया सेल पुणे च्या सह संयोजक पदी नेमणूक…

तनिष्क कुलकर्णीची भाजप सोशल मीडिया सेल पुणे च्या सह संयोजक पदी नेमणूक.

पुणे – स्थापत्य अभियंता असलेला २२ वर्षीय भाजप युवा कार्यकर्ता तनिष्क कुलकर्णी याची भाजप पुणे सोशल मिडिया सेलच्या सह संयोजक पदी नेमणूक करण्यात आली असून त्याने नुकतेच भाजप पुणे सोशल मीडिया सेल चे संयोजक निखिल पंचभाई यांच्या उपस्थितीत भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते सह संयोजकपद नियुक्ती पत्र स्वीकारले.

आमदार चंद्रकांतदादा पाटील, भाजप महाराष्ट्र सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजप पुणे सरचिटणीस पुनित जोशी आणि भाजप, भाजप, पुणे सोशल मीडिया सेल संयोजक निखिल पंचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तयार झालेला तनिष्क कुलकर्णी हा युवा कार्यकर्ता अगदी लहान वयापासूनच समाज आणि राजकारणात सक्रिय आहे. त्याने शालेय जीवनात असतानाच अनेक गणपती मंडळे, पोलीस मित्र तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कारकिर्दीची सुरुवात केली. महाविद्यालयीन काळात एमआयटीमध्ये संयुक्त सरचिटणीस म्हणून निवडून आल्यावर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रियपणे काम केले. २०१४ मधे भाजप कार्यकर्ता म्हणून राजकारणात सक्रिय झाल्यावर २०१६ मधे
तनिष्क ने पहिल्यांदा भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया सरचिटणीस पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत तसेच विधानसभा निवडणुकी मधे सक्रिय सहभाग नोंदविला. २०२० मधे भाजप सोशल मीडिया सेल कोथरूड विधानसभेचा निमंत्रक म्हणून जबाबदारी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *