मोशीतील जलवाहिनी, पाण्याच्या टाकीचा ‘शुभारंभ’

पिंपरी । प्रतिनिधी
मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील ८०० मी. मी. जलवाहिनी आणि पाण्याची टाकी उभारण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे परिसरातील सुमारे ५० लाख नागरिकांना होणारा पाणीपुरवठा नियोजन सक्षम होणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने मोशी येथील सेक्टर-१२ येथे पाण्याची टाकी आणि बोऱ्हाडेवाडी येथील जलवाहिनी भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.  ८०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी सावतामाळीनगर येथून टाकण्यात येत आहे.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव यांच्यासह हनुमंत लांडगे, सोनम जांभूळकर, वंदना आल्हाट, निलेश बोराटे, निखील बोऱ्हाडे, निखील काळकुटे, शिवराज लांडगे, राजेश सस्ते, गणेश सस्ते, रवी जांभुळकर, नितीन बोऱ्हाडे, संतोष जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, उप अभियंता शेखर गुरव, कनिष्ठ अभियंता विजय लाडे, अनिल इदे आदी मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.समाविष्ट गावांमध्ये विकासाला प्राधान्य…
आमदार लांडगे म्हणाले की, बोऱ्हाडेवाडी, देहुरस्ता, शिवरोड आदी परिसरातील सुमारे ५० हजार नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.  तसेच, भाजपाच्या माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे आणि कुटुंबियांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करुन आपल्या खासगी मालकीच्या जागेतून जलवाहिनी टाकण्यासाठी प्रशासनाला जागा उपलब्ध करुन दिली. याबद्दल बोऱ्हाडे कुटुंबियांचे आभार व्यक्त करतो. समाविष्ट गावांतील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले असून, एक-एक प्रकल्प पूर्ण करताना विशेष समाधान वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *