खासदार श्रीरंग बारणे एकनाथ शिंदे गटात सामील

रोहित खर्गे
विभागीय संपादक 
१९जुलै २०२२

चिंचवड


शिवसेनेत बंड झाल्यानंतर हळूहळू धक्के बसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील एका पंचताराकिंत हॉटेलात आपल्या समर्थक आमदारांच्या घेतलेल्या बैठकीला शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १२ खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावून त्यांना समर्थन दिले. त्यात पिंपरी चिंचवड येथील मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खासदार बारणे यांच्या घरासमोर पोलीस संरक्षण लावण्यात आले आहे.

घराबाहेर पोलिसांचा फौज फाटा

पिंपरी-चिंचवड, मावळ आणि पनवेल, उरण, खालापूर या भागाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. खासदार बारणे हे सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला आवाजकडे बोलताना सांगितले होते कोरोना काळात उद्धव साहेबांचे काम सहरनिय आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी आकुर्डी येथील हॉटेल मध्ये आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थित त्यांचे चिरंजीवानी उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी मेळावा घेतला होता तेव्हा शहरातील सेनेच्या अनेक दिगग्ज नेत्यांनी हजेरी लावली होती पण खासदार श्रीरंग बारणे गैरहजर होते. म्हणजेच इतर नेत्यांप्रमाणेच खासदार श्रीरंग बारणे हे देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील झाल्याचे समजते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *