गरीबा घरची चूल पेटवणे हे यज्ञा पेक्षाही पवित्र काम. प्रमोद दंडवतेंनी अनेक गरजूंना दिले किराणा साहित्य..

बातमी – विभागीय संपादक रवींद्र खुडे, शिरूर
मलठण :
दि. 19/05/2021

कोव्हिड 19 या संसर्गजन्य रोगाने अवघ्या जगाला ग्रासले असून, भारतात या महारोगाची दुसरी लाट आली आणि त्यात गरीब कष्टकरी लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेक गावे कडकडीत बंद असल्याने, अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे कामधंदे व रोजगारही बंद आहेत. अशा काळात गरीब माणसाच्या घरात चूल पेटवण्यासाठी, मलठण येथील प्रमोद बाळासाहेब दंडवते यांनी स्वतःच्या खिशातून पदरमोड करून, हा उपक्रम सुरू केला आहे. आता ७० गरजू कुटुंबांना किराणा किट दिलेय. तसेच, गेल्या वर्षीही १५० कुटुंबातील गरजूंना किराणा मालाचे वाटप केले होते. मलठण गाव हे गेले पंधरा दिवस कडकडीत बंद असल्याने, गावातील छोटे मोठे व्यवसाय व विशेषतः नाभिक बांधवांची दुकाने बंद आहेत.

त्यांना व गावातील बारा बलुतेदार समाजातील सर्व गरजू व्यक्तींना, मलठण येथील मल्लिकार्जुन मंदिरासमोर, किराणा किटचे वाटप करण्यात आले.

 यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. अनिल शिंदे यांनी सांगितले की, "
   गरीबांघरची चूल पेटविणे हे पवित्र यज्ञा पेक्षाही पवित्र काम आहे. काही लोक नुसतेच बोलघेवडे असतात. पण प्रत्यक्ष कृती करत मदत करणारे कमी आहेत. आज बोलणाऱ्यांपेक्षा गरिबांना प्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचीच अधिक गरज आहे."

  त्याचप्रमाणे, प्रमोद बाळासाहेब दंडवते तसेच गावातील अनेक युवकांनी स्वतःच्या खिशातून पदरमोड करून हा उपक्रम सुरू केला आहे. याचा मलठणकरांना अभिमान असल्याची भावना, यावेळी उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींनी व्यक्त केली. 

  मंगेश दंडवते, सुभाष दंडवते, प्रसाद गीते, अभिषेक गावडे, प्रकाश बोडरे, किरण देशमुख, राहुल दंडवते, अक्षय शिंदे, प्रशांत साळवे, गणेश दंडवते, सुभाष गायकवाड, शेखर गायकवाड, अविष्कार चव्हाण, रशीद शेख, शिवम दंडवते, गणेश वेताळ, मोहन लष्करे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच कोविडच्या सर्व संकेतांचे पालन करून किराणा साहित्याचे वाटप करत हा स्तुत्य उपक्रम मलठणच्या या तरुणांनी राबविल्याने, त्यांचे कौतुक होत आहे.

  प्रमोद दंडवते यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले की,  
  "मी ही जी मदत करत आहे, ती माझे वडील दिवंगत कै. बाळासाहेब दंडवते यांच्या स्मरणार्थ करत आहे. त्यांच्या हयातीमध्ये त्यांनीही अनेक गरजूंना नेहमी मदत केली होती. त्यांच्या आत्म्याला समाधान लाभण्यासाठीच, मी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठवून माझ्या परीने मी असाच मदतीचा प्रयत्न पुढेही चालू ठेवीन."

  आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीनेही, तमाम जनतेला कोव्हिड च्या पार्श्वभूमीवर आवाहन करण्यात येतेय की, आपणही गरजूंना आपापल्या परीने मदत करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *