पिंपरी चिंचवड शहरात भव्य आमदार चषक राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०६ डिसेंबर २०२२

पिंपरी चिंचवड


महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व  पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटणे द्वारे  पिंपरी चिंचवड मध्ये मिनी सब ज्युनिअर गटाच्या  राजस्तरीय स्पर्धेचे आयोजन ९ डिसे. ते ११ डिसे.२०२२ दरम्यान  करण्यात आले आहे. सदर स्पर्धेच्या आयोजन पिंपरी विधान सभा मतदार संघाचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांच्या विकास निधीतून पार पडणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यातून खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक व पालक वर्ग मिळून ७०० लोक दर दिवशी उपस्थित होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन ९  डिसेंबर २०२२ रोजी मदनलाल धिन्ग्रा मैदान, निगडी येथे संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित केले आहे. या स्पर्धा इंडियन, रिकरव व कामाऊंड या तिन्ही प्रकारात होणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभा मध्ये धनुर्विद्या या खेळाचे पहिले मराठी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण हे १० व ११ डिसेंबर २०२२ ला संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित केले आहे. या स्पर्धे मुळे शहरात हा खेळ अधिक विकसित होणार आहे व नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच या स्पर्धे मधून आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी चमू निवडल्या जाणार आहे. स्पर्धे दरम्यान ओलांपिक व इतर आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील उपस्थित राहणार आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *