पुणे महापालिकेकडे कंत्राटी कामगारांची 20 कोटींची थकबाकी

३० नोव्हेंबर २०२२


महापालिकेचे विविध विभाग व आस्थापनांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील सात महिन्यांत २० कोटी १२ लाख ३ हजार ९०२ वेतन थकले आहे. हे वेतन थकवून कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांवर फसवणुकीच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेमधील विविध विभाग आणि खात्यांमध्ये ठेकेदार पध्दतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. यामध्ये विविध क्षेत्रीय कार्यालयांमधील आरोग्य, साफसफाई, आस्थापना, सुरक्षा, मोटार वाहन, माहिती तंत्रज्ञान, पथ अशा अनेक विभागांमधील ६ हजार ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीतील २० कोटी १२ लाख ३ हजार ९०२ वेतन थकले आहे. यामध्ये भविष्य निर्वाह निधी (ईपीई) तसेच कर्मचारी विमा योजना (ईएसआयसी) रकमेचाही समावेश आहे.

नगर रोड, ढोले पाटील रोड, घोले रोड, औंध, कोथरूड, वारजे, सिंहगड, धनकवडी, हडपसर, कोंढवा, बिबवेवाडी, विश्रामबागवाडा आदी क्षेत्रीय कार्यालयांसह आरोग्य विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, विद्युत विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. यामध्ये बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक वेतन थकले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *