पिंपरीत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर होणाऱ्या आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत विजेतेपदासाठी लढणार १६ संघ

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०९ मार्च २०२२

पिंपरी


क्रीडानगरी पुण्यात प्रथमच २८ वी नेहरू अखिल भारतीय पुरूष गटाची आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेचे आयोजन मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी येथे बुधवार ९ मार्च २०२२ पासून होणार आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हसिटीजच्या मान्यतेने १९ दिवस चालणाऱ्या या भारतातील महत्वाच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युट आहेत. या महत्वाच्या स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी दिनांक १९ मार्च राजी होइल. प्रतिष्ठेच्या या सामन्यात चार विभागातील (दक्षिण, पुर्व, उत्तर आणि पश्चिम) १६ विद्यापीठ संघ विजेतेपदासाठी एकमेकांविरूध्द प्रथम साखळी व नंतर बाद पध्दतीच्या सामन्यात पुण्यात लढणार आहे.

आंतर विभागीय स्पर्धेत पात्र झालेल्या स्पर्धांमधून गुरूनानक देव विद्यापीठ, अमृतसर, पंजाब विद्यापीठ पतियाला, कुरूकक्षेत्र विद्यापीठ, आणि लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवारा (उत्तर विभाग), बेंगलुरू सिटी विद्यापीठ, बेंगलुरू विद्यापीठ, एसआरएम विद्यापीठ, चेन्नई व मनोमन्यूम सुंदरनार विद्यापीठ, तिरुनलवेली (दक्षिण विभाग); एमजी काशी विद्यापीठ, संभलपूर विद्यापीठ, व्हिबीएसपी विद्यापीठ, जौनपूर आणि बनारस हिंदू विद्यापीठ (पूर्व विभाग); पश्चिम विभागाकडून सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ, एलएनसीटी विद्यापीठ, भोपाळ; मुंबई विद्यापीठ, आणि पारुल विद्यापीठ, वडोदरा. एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युट ही स्पर्धा सलग पाचव्यांदा प्रायोजित करत आहे. गेली अनेक वर्ष एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युट हॉकीच्या प्रचार व प्रसारासाठी शालेयस्तरापासून प्रोत्साहन देत आली आहे. पुण्यातून अनेक दिग्गज हॉकी खेळाडू तयार होऊन आंतररष्ट्रीयस्तरावर आपल्या देशाचे, राज्याचे व पुणे शहराचे नावलौकिक करावे हाच एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युटचा मुख्य उद्देश आहे.

एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युटच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले या जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धा (जेएनएचटी) सोसायटी, नवी दिल्ली च्या उपाध्यक्षा आहेत. जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धा (जेएनएचटी) सोसायटीचे महासचिव म्हणाले, ज्या शहरामध्ये दिग्गज हॉकीपटू तयार झाले त्या शहरात ही स्पर्धा होत आहे, हा आमचा बहुमान आहे. जेएनएचटी १९६४ पासून राष्ट्रीय व आंतररष्ट्रीयस्तरावर हॉकी खेळाचा प्रचार व प्रसार करीत आहे. यासाठी आम्ही राष्ट्रीय व आंतररष्ट्रीयस्तरावरील स्पर्धांचे सुध्दा आयोजन करीत आहोत. मी एसएनबीपीच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले मॅडम त्यांचे आभार मानतो ज्या आमच्या सोसायटीच्या प्रथम महिला निवडल्या गेल्या आहेत. आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीवरील प्रेम आणि या खेळाच्या प्रसार व प्रचार करण्यासाठी त्या सातत्याने करीत असलेले प्रयत्न यासाठी मी त्यांचे आभार मानतो.

डॉ. वृषाली भोसले म्हणाल्या, एसएनबीपीच्या माध्यमातून आम्ही हॉकी खेळाचा शालेयस्तरापसून जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून विकासासाठी प्रयत्नशिल असतो. याचाच भाग म्हणून आम्ही पुढिल पाऊल टाकत विद्यापीठस्तरावरील हॉकी खेळा प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. मला विश्वास आहे की या स्पर्धेतून नक्कीच भारतीय संघासाठी उत्कृष्ट खेळाडू मिळतील आणि त्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा म्हणजे एक महत्वाचा टप्पा ठरेल. एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युटच्या संचालिका डॉ. ऋतूजा भोसले म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षापासून एसएनबीपी शालेयस्तरापासून हॉकी खेळाला चालना देण्याचे कार्य करीत आहे. याच माध्यमातून आम्ही एसएनबीपी अखिल भारतीय मुलांची हॉकी स्पर्धा आयोजित करत आलो आहोत. हॉकी इंडियाच्या वार्षिक स्पर्धा कार्यक्रमात समावेश असलेली ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहे. याच बरोबर राज्यस्तरीय मुलींची हॉकी स्पर्धा सुध्दा आयोजित केली जाते. याच बरोबर -सुभद्रा- जिल्हास्तरीय आंतर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत १० खेळांचा समावेश आहे. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या स्पर्धांच्या व्यतिरीक्त आयोजित केली जाते. आमचा मुख्य उद्देश आणि ध्येय एकच आहे की, आमची स्वता:ची हॉकी अकॅडमी सुरू करणे ज्यावर सध्या आमचे काम सुरू आहे.

एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युटचे क्रीडा संचालक फिरोज शेख म्हणाले, या स्पर्धेसाठी १६ संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात चार संघ असणार आहेत. उद्घाटनाच्या दिवशी २ सामने होतील. गुरुवारी सुध्दा दोन सामने होतील. शुक्रवारपासून रोज चार लढती होतील. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने १६ व १७ मार्च रोजी होतील. १८ मार्च रोजी उपांत्य फेरीचे सामने होतील.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *