नवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

३० नोव्हेंबर २०२२


आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज पीएमएलए न्यायालयात सुनावणी पार पडली. पण न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पीठासमोर मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. प्रकरणाशी संबंधित मालमत्तेची मूळ मालकीण असलेल्या मुनीरा प्लम्बर हिने दिलेला जबाब आणि न्यायालयात सादर केलेले पुरावे परस्परविरोधी आहे. तरी तिचा जबाब पूर्णतः बाजूला ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *