लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या – सुशांत कुटे, जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष, मनसे

(बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक)

शिरूर – १० मे २०२१

 【  कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर लसीकरण सुरु झाले आहे.

१८ ते ४५ वयोगटातील लोकांच्या लसिकरणा संदर्भात, सरकारने नुकतीच घोषणा केली असुन हळुहळु त्या लसिकरणाचा वेग देखील वाढणार आहे. मात्र यातील महत्त्वपूर्ण बाब अशी कि, शिरुर लगतच मोठी औद्योगिक वसाहत असुन, विविध जिल्ह्यांतील तसेच परराज्यातील लोक शिरुरच्या विविध भागांत भाडेतत्वावर राहत आहेत. त्यामुळे ते लोक देखील लसिकरणासाठी रुग्णालयात गर्दी करत आहेत. त्यांचा मुळ पत्ता जरी वेगळा असला, तरी ते शिरुरला रहात असल्याने त्यांचे लसीकरण प्रामुख्याने शिरुरलाच होणार हे वास्तव आहे.

  परंतु, त्यामुळे शिरुरचे मूळ रहीवासी लसिकरणापासुन वंचित राहु शकतात अथवा त्यांना लसिकरणाचा लाभ उशीरा मिळू शकतो. 

त्यामुळे या बाबीचा गांभीर्याने विचार व्हावा, अन्यथा जशी इतर तालुक्यांतील लोकांनी शिरुरला कोरोना चाचणी करुन शिरुरची कोरोना संख्या वाढवली, तसाच काहीसा प्रकार होऊ शकतो.】

असे इशारावजा निवेदन, मनसे चे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे व रवींद्र गुळादे यांनी, शिरुरचे तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांना दिलेय.