ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

३० नोव्हेंबर २०२२


ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (वय ७४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

एक वर्षापूर्वी डॉ.कोत्तापल्ले यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून पिंपरी-चिंचवडच्या राहत्या घरी सून आणि मुलगा त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. परंतु, गेल्या १५ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *