राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा महाविकास आघाडीच्यावतीने लोणावळ्यात निषेध

२१ नोव्हेंबर २०२२


छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक बोलल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा महाविकास आघाडीच्यावतीने लोणावळ्यात निषेध करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, बाळासाहेब पायगुडे, नारायण आंबेकर, नारायण पाळेकर, राजू बोराटी, संध्या खंडेलवाल, उमा मेहता, पुष्पा भोकसे आदी उपस्थित होते. राज्यपालांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा व त्यांची राज्यपालपदावरुन तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *