खेड तालुका काँग्रेस पक्षा तर्फे हातगाडीवरून दुचाकी व गॅस सिलेंडरची मिरवणूक काढत इंधन दरवाढीचा निषेध…

खेड : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
इंधन दरवाढीचा निषेध करत खेड तालुका काँग्रेस पक्षा तर्फे चाकण येथे गुरुवारी हात गाडीवरून दुचाकीची आणि गॅस सिलेंडरची मिरवणूक काढून अनोखे आंदोलन करण्यात आले काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्राच्या भूमिकेवर टीका करीत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली खेड तालुका व चाकण काँग्रेस पुणे जिल्हा किसान काँग्रेस व महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले खेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस काळूराम कड किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे अल्पसंख्यांक सेलचे जमीर काझी भास्कर तुळवे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली इंधन दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून दुचाकीची व गॅस सिलेंडरची हातगाडी वरून मिरवणूक देखील काढण्यात आली.


          यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब गायकवाड अतिश मांजरे वंदना सातपुते आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्राने तातडीने इंधन दरवाढ मागे न घेतल्यास शेणाच्या गोवऱ्या कुरिअरने दिल्लीला पाठवण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड यांनी सांगितले यावेळी चाकण पोलिसांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून इंधन दरवाढीच्या विरोधात सध्या काँग्रेसतर्फे आणखी तीव्र आंदोलने करण्याचा इशारा तालुका अध्यक्ष विजय डोळस यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *