ज्येष्ठ नागरिकांना दिलासा स्मार्ट कार्ड नोंदणीला ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

२१ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सुलभ व्हावा , यासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली . त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ज्येष्ठांनी स्मार्ट कार्ड काढत आहेत ; परंतु काही केल्या सगळे कार्ड काढणे पूर्ण होत नसल्याने महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे . ज्येष्ठ नागरिकांना आता स्मार्ट काढणे बंधनकारक करण्यात आले आहे . त्याशिवाय प्रवास करताना सवलत देता येत नसल्याचे सांगण्यात आले ; परंतु महामंडळाने ज्या सवलतधारकांनी अद्याप एसटीचे स्मार्ट कार्ड काढलेले नाही अशा नागरिकांसाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत नोंदणीला मुदतवाढ दिली आहे ही मुदत असेपर्यंत सवलतधारकांना एसटीचे स्मार्ट कार्ड नसले तरी बसमधून सवलतीमध्ये प्रवास करता येणार आहे.

एसटीकडे विविध योजनेचे स्मार्ट कार्ड आहेत . त्यांचे नूतनीकरण करण्यात आले . मात्र , त्यानंतर त्यासाठी करावे लागणारे रिचार्ज होत नसल्याच्या तक्रारी आहेत . सर्व्हरमुळे अडचण असल्याचे सांगितले जात आहे . ज्येष्ठांना प्रवास करताना अडचणी येऊ नयेत , यासाठी एसटी महामंडळातर्फे स्मार्ट नोंदणीची मुदत पुन्हा वाढविण्यात आली आहे . ज्यांनी अजून स्मार्ट कार्ड काढले नाही , त्यांनी कार्ड काढून घ्यावे , असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *