नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला उत्साहात…

नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला उत्साहात

नारायणगाव :- (किरण वाजग)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळ आणि ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव, बहि:शाल शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त समन्वयाने डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यान मालेमध्ये पहिले व्याख्यान पुणे येथील कावेरी महाविद्यालयातील डॉ.श्वेता बापट यांचे झाले.त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘नोकरीच्या मुलाखतीची तयारी’ या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.


दुसऱ्या दिवशीचे व्याख्यान महाराष्ट्रातील प्रसिध्द वक्ते प्राचार्य प्रदीप कदम यांनी ‘वेध भविष्याचा’ या विषयावर अतिशय सुंदर संवादपूर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी अनेक महापुरुषांच्या कर्तव्यांची उदाहरणे देऊन आजच्या युवा पिढीने आपले व्यक्तिमत्व कसे घडवावे हे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून यश संपादन पाहिजे. त्यांनी यशाची व्याख्या सांगून यश शब्दाचा खरा अर्थ उपस्थित श्रोत्यांना समजावून सांगितला. या व्याख्यान *मालेचा समारोप विश्वास पटवर्धन यांच्या ‘शब्दांचा मजेदार प्रवास ‘ या विशेष विषयाच्या अनुषंगाने झाला. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या राशीचे लोक कसे असतात, त्यांचा स्वभाव, गुणधर्म इत्यादी वर विनोदी शैलीत मार्गदर्शन केले.
या डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यान मालेचे प्रास्ताविक बहि:शाल शिक्षण केंद्राचे कार्यवाह प्राध्यापक डॉ.अनिल काळे यांनी केले .*त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षणमंडळाचा उद्देश्य स्पष्ट करून डॉ. बाबासाहेब जयकर यांचे योगदान विद्यार्थ्यं၊ना सांगितले. तर सूत्रसंचालन प्रा.अक्षय भोर यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद कुलकर्णी, उपप्राचार्य जी.बी.होले, प्रा. सुभाष कुडेकर प्रा.शिवाजी टाकळकर, प्रा.उत्तम पठारे, प्रा.अशोक कानडे, प्रा.धनंजय वाघ तसेच बी.बी.ए /बी.सी.ए विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *