एमआयडीसीतील सर्व भंगार दुकाने बंद करा – उदय सामंत

२१ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


उद्योजक हा आपल्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे . उद्योगमंत्री या नात्याने त्यांच्या व्यथा जाणून घेणे महत्त्वाचे वाटले , यासाठी आलो आहे , एमआयडीसीतील भंगार दुकाने शंभर टक्के बंद करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत , असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोशी येथे बोलताना सांगितले . लघुउद्योग संघटनेच्या वतीने मोशी येथे लघुउद्योजकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यावेळी सामंत बोलत होते या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे , माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील , आमदार महेश लांडगे , शिंदे गटाचे पिंपरी- चिंचवड बाळासाहेब वाल्हेकर , लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे , सचिव जयंत कड उपस्थित होते.

उदय लोकप्रतिनिधींनी सामंत म्हणाले , शहराध्यक्ष उद्योजकांच्या बाबतीत सकारात्मक विचार केला पाहिजे . छोटा उद्योजक हा मोठ्या उद्योजकांचा पाया आहे . त्यांनाही दर्जा समान मिळाला पाहिजे . ही दोन्ही चाके समांतर चालली पाहिजेत . महेश लांडगे पिंपरी- चिंचवडमधील आमदार म्हणाले , पिंपरी उद्योजकांना छळणारा शास्तीकर हा तसेच आहे . एमआयडीसीत मूलभूत सुविधा आणण्यासाठी प्रयत्न करू व उद्योगमंत्र्यांकरवी उद्योजकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले .


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *